अकोला: थकित पाणीपट्टी कर न भरल्याने अनामिका अपार्टमेंटच्या नळ जोडणी खंडीत
Akola, Akola | Sep 26, 2025 अकोला महानगरपालिका आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांच्या आदेशान्वये 26 सप्टेंबर रोजी पुर्व झोन अंतर्गत बिर्ला बी येथील अनामिका अपार्टमेंटमधील 3 फ्लॅट धारकांच्या बिना मीटर अर्धा इंची नळ जोडणी खंडीत करण्यात आली. कारण, या फ्लॅट धारकांकडे सन 2017-18 पासून थकित पाणीपट्टी कर रु. 91,800/- राहिल्याने भरणा न केल्यामुळे कारवाई करण्यात आली. ही कारवाई दुपारी सुरू होऊन सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालू होती. उपअभियंता संदीप चिमनकर, कनिष्ठ अभियंता निवृत्ती दातकर, विभागीय फिटर प्रवीण वरूळकर, मीटर रीडर सुबोध वानखडे