गोंदिया: धामणगाव येथे लाकडी काठीने मारहाण, रावणवाडी पोलिसात गुन्हा दाखल
Gondiya, Gondia | Oct 18, 2025 धामणगाव येथे राकेश टेंभरे यांच्यावर 14 ऑक्टोंबर च्या सायंकाळी 6 वाजता आरोपीने हल्ला केला. राकेश व त्याचे वडील म्हशी घेऊन रस्त्यावरून पाई जात होते. यावेळी आरोपी आणि त्याचा मित्र घटनास्थळी आले. आरोपीने आपले म्हशी येथे नेल्यावरून वाद निर्माण करीत शिवीगाळ केली. आणि राकेशच्या वडिलावर राग काढित बाजूला पडलेल्या लाकडी काठीने मारहाण केली. यात त्यांच्या उजव्या हातावर गंभीर दुखापत झाली. त्यांना त्वरित वैद्यकीय उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.