अडावद येथील वडगाव रस्त्यावर गुरूवारी ३० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता एक अत्यंत भीषण अपघात घडला. टरबूजने भरलेल्या भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने, दुचाकीस्वार आकाश ज्ञानेश्वर पाटील (वय २१, रा. इंदिरानगर प्लॉट, अडावद) तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातामुळे अडावद परिसरात शोककळा पसरली आहे.