अमरावती: बळी प्रतिपदेच्या दिवशी दुपारी किंवा संध्याकाळी आपल्या गावात, शेतात, घरात दिवा लावा, मौन पाळा: बच्चू कडू यांचे आवाहन
दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच बळी प्रतिपदेच्या दिवशी माजी मंत्री बच्चू कडू यांनी जनतेला आवाहन केले की, बळी राजांचे स्मरण करुन आणखी एकही “बळी” म्हणजे शेतकरी शेतमजुराचा जिव जाणार नाही ही शपथ घेऊन मौन पाळा, आणि शेतकरी शहिदांना श्रद्धांजली अर्पण करा. महाराष्ट्रात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आपल्या गावात, शेतात, घरात दिवा लावा, मौन पाळा शेतकरी शहिदांना अभिवादन करा, हा केवळ सण नाही… ही लढ्याची शपथ आहे! असे आवाहन बच्चूकडू यांनी केले आहे.