जालना: पीर कल्याण परिसरात रक्ताचा सडा; 22 वर्षांच्या अतुल आघामची निर्घृण हत्या; दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात
Jalna, Jalna | May 29, 2026 जालना तालुक्यातील पीर कल्याण परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अतुल शिमोन आघाम (वय 22) या तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. शुक्रवार दि. 29 मे 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीर कल्याण परिसरात दिवसाढवळ्या अतुल आघाम याच्यावर काही इसमांनी धारदार चाकूने हल्ला केला.