बोगस कॉल सेंटर हाताळणारे आदील सैयद निशार अहमद सैयद (वय ३२, रा. ओशिवरा, मुंबई) व अकबर खान रौनक अली खान (वय ४०, रा. मालाड पूर्व मकराणी पाडा, मुंबई) या दोघांना शुक्रवारी २१ नोव्हेंबर रोजी मुंबई येथून अटक करण्यात आले. या प्रकरणात अटक केलेल्यांची संख्या आता १० झाली आहे. शनीवारी २२ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता न्यायालयाने दोघांना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.