हवेली: वाल्हेकर वाडी येथे शिक्षकाकडून चौथीतल्या विद्यार्थिनीसोबत वर्गातच अश्लील कृत्य; नेमकं प्रकरण काय?
Haveli, Pune | Oct 18, 2025 पिंपरी-चिंचवडमधून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. येथील महापालिकेच्या शाळेत इयत्ता चौथीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत वर्गशिक्षकाने अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.