वरोरा: वरोरा तालुक्यातील बांद्रा येथे कर्जबाजारी पणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या
वरोरा तालुक्यातील बांद्रा गावचे शेतकरी उमेश तिमाजी हक्के वय 51वर्ष यांनी काल दि. 15 सप्टेंबर ला सायंकाळी 6वाजता जनावरे बांधण्यासाठी तयार केलेल्या गोठ्यात ठेवून असलेले तणनाशक औषध प्राशन केले. त्यानंतर त्यांना ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय वरोरा येते नेण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येते नेले मात्र आज दि 16 सप्टेंबर पहाटे दोन वाजता त्यांची प्राणज्योत मावळली