राष्ट्रवादीत आमदार दातेंकडून मुस्कटदाबी होत आहे. दातेंना आम्ही आमदार केले तेच मला अडचणीत आणत आहेत. विधानसभेत राष्ट्रवादीने शब्द पाळला नाही. काशिनाथ दातेंना निवडून आणले तेच आमच्या विकासकामात अडथळा आणत आहेत, असा गंभीर आरोप अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी केला आहे. ते ६ नोव्हेंबरला शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.