जळगाव एमआयडीसीतील बीएचआर पतपेढी समोर एका वृध्दाच्या दुचाकीवर जवळ पिशवीत ८ लाख रूपये ठेवलेली रक्कमेची पिशवी व हातातील मोबाईल अज्ञात दोन जणांनी दुचाकीवर येवून चोरून नेल्याची घटना शुक्रवारी १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत शनिवारी १५ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.