तळोदा: आमदारांच्या शेतात बिबट्या अखेर जेरबंद, प्रतापपूर शिवारातील घटना
तळोदा तालुक्यातील प्रतापूर शिवारात आमदार राजेश पाडवी यांच्या शेतात बिबट्या वनविभागा मार्फत लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात अखेर जेरबंद झाला आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. गेल्या आठ दिवसांपासून बिबट्यानं या परिसरात धुमाकूळ घातला होता.