वरोरा: जामगाव बु. येथील शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या सोयाबीन ढिगाऱ्याला लावली आग
वरोरा तालुक्यातील जामगाव बु येथील शेतकरी अविनाश तूरानकर यांनी अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या आपल्या सोयाबीनच्या ढिगाराला आग दि. 19 ऑक्टोबर 12 वाजता आग लावली. अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सोयाबीन काढणे परवडत नसल्याने अखेर शेतकऱ्याने सोयाबीन ढिगाऱ्याला आग लावली .तरी त्वरित शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.