आगामी पनवेल महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्शवभूमीवर भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून पक्षाची ताकद अधिक मजबूत होत आहे. त्यापार्शवभूमीवर कळंबोली मधील शिवसेना उबाठा गटाचे उप शहर प्रमुख संजय भालेराव यांच्यासह लोटस सोसायटीमधील रहिवाश्यांनी भाजपचे विकासाचे कमळ हाती घेतले. या सर्व प्रवेश कर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षात स्वागत केले. कळंबोलीच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप सदैव तत्पर राहील. प्रगतीच्या दिशेने जे काही आवश्यक आहे, ते सर्व सहकार्य पक्षाच्या वतीने दिले जाईल अशी ग्वाही दिली.