नागपूर ग्रामीण: बेसा पिपळा नगरपंचायतीचा गलथान कारभार: रस्ता दुरुस्ती न झाल्यास सोमवारी घेरावाचा इशारा
पिपळा नगरपंचायतीच्या वॉर्ड क्र. १७ मधील घोगली चौक ते हनुमान मंदिर-इन्सारा मार्गावर मलवाहिनीच्या कामामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून रस्ता चिखलमय असल्याने ९०० नागरिकांचा संपर्क तुटला असून, पावसाळ्यात मेडिकल इमर्जन्सी उद्भवल्यास जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.