नवी मुंबईकरांच्या आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टीने ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर येत्या २५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी पहिलं विमान उतरणार असून, त्यादिवशी या अत्याधुनिक विमानतळावरून पहिली उड्डाण सेवा अधिकृतपणे सुरू होणार आहे, अशी माहिती सिडकोकडून देण्यात आली आहे. २५ डिसेंबर रोजी सकाळी सुमारे ८ वाजता पहिलं प्रवासी विमान विमानतळावर उतरणार आहे. त्यानंतर त्याच दिवशी सकाळी ८.४० वाजता विमानतळावरून पहिलं व्यावसायिक उड्डाण रवाना होणार आहे. पहिल्या टप्प्यात एकूण ३० नियोजित असून, देशांतर्गत प्रवासी सेवेला प्राधान्य देण्यात येणार आहे.