लोहा: घरकुलाचे बिल थेट बॅक खात्यात जमा करण्याच्या व इतर मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर दिव्यांग महाविर गायकवाड यांचे आमरण उपोषण
Loha, Nanded | Sep 29, 2025 आज सोमवार दि २९ सप्टेंबर २०२५ रोजी पासुन तहसील कार्यालय लोहा समोर दिव्यांग महाविर गायकवाड यांनी विविध मागण्यांसंदर्भात आमरण ऊपोषण सुरू केले आहे. या उपोषणात त्यांच्या मागण्या यामध्ये शहरी व ग्रामीण भागातील दिव्यांग,मजूरदार, गोरगरीब, यांना तत्काळ घरकुल अनुदान बिल बॅक खात्यात जमा करावे, संजय गांधी निराधार अनुदान योजना समीतीवर दिव्यांगांना सदस्यत्व तत्काळ देण्यात यावे या व इतर विविध मागण्यांसंदर्भात आज पासून आमरण ऊपोषण सुरू केले असल्याची माहिती आज दुपारी बाराच्या सुमारास गायकवाड यांनी दिली