नागपूर ग्रामीण: तोल जाऊन पडल्याने उपचारादरम्यान इलेक्ट्रिशन चा मृत्यू
वाडी येथील पोलिकॅब कंपनीच्या गोदामात विद्युत काम करत असताना ओम शंकर लांडे (वय २०) या तरुणाचा लोखंडी शिडीवरून (घोडीवरून) तोल गेल्याने खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्याला उपचारासाठी मेयो हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी वाडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.