भंडारा तालुक्यातील कारधा पोलीस स्टेशन अंतर्गत जुना आरटीओ ऑफिस परिसरात दि. २४ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान पोलिसांनी केलेल्या गस्तीदरम्यान अवैध रेतीची चोरटी वाहतूक करणारा एक विना क्रमांकाचा ट्रॅक्टर पकडण्यात आला. फिर्यादी विनयकुमार साठवणे आपल्या पथकासह पेट्रोलिंगवर असताना, मांडवी येथील चालक लेखराज प्रकाश बाभरे याने विनापरवाना १ ब्रास रेतीची (किंमत ६,००० रुपये) वाहतूक करताना पोलिसांचा इशारा डावलून ट्रॅक्टर बेदरकारपणे चालवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला.