पातुर: कीटकनाशक फवारणीमुळे २३ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; अमरावती आणि अकोला जिल्ह्यात शोककळा पसरली.
Patur, Akola | Sep 29, 2025 अकोला जिल्ह्यातील म्हातोडी सासरवाडी व अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई येथील रहिवासी गणेश ज्ञानेश्वर कात्रे (२३) चार दिवस कीटकनाशक फवारणी करत होता. २५ सप्टेंबर रोजी अचानक प्रकृती बिघडल्याने त्याला अकोल्याच्या शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गणेश हा कात्रे कुटुंबाचा एकुलता एक मुलगा होता. या घटनेमुळे दोन्ही जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.