उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या बेताल व शिक्षणविरोधी वक्तव्याच्या निषेधार्थ परळी तालुक्यातील सिरसाळा येथे आज गुरुवार दि.18 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता, तीव्र आंदोलन करण्यात आले. सिरसाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात विविध संघटना व नागरिकांनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली. यावेळी शिक्षणाचा अपमान सहन केला जाणार नाही, संविधान आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही, अशा घोषणा देण्यात आल्या.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले वक्तव्य तात्काळ मागे घ्याव