मोहाडी: भंडारा रोड येथे रेल्वेतून पडलेल्या २३ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू, घटनेचा मर्ग वरठी पोलिसात दाखल
भंडारा रोड येथे आशिष अमर भालाधरे, वय 23 वर्षे रा. वाजपेयी वार्ड गौतम नगर गोंदिया हा युवक दि. 13 सप्टेंबरला इंटरसिटी रेल्वेने प्रवास करीत असताना तो रेल्वेतून पडला. यावेळी रेल्वे सुरक्षा बलाने जखमीला उपचारार्थ शास. उपजिल्हा रुग्णालय भंडारा येथे दाखल केले. मात्र, जखमेची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला मेडिकल हॉस्पिटल नागपूर येथे दाखल केले. मात्र उपचारादरम्यान सदर युवकाचा मृत्यू झाला. यावेळी पोलीस पंचनामा व प्राप्त वैद्यकीय अहवालावरून घटनेचा मर्ग वरठी पोलिसात दाखल करण्यात आला आहे.