भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा बायपासवर असलेल्या वैनगंगा नदीच्या कोरंबी पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, पुलाचे जॉइंट्स निखळल्याने येथे मोठी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली आहे. दिनांक 8 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता दरम्यान या मार्गावरून प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांच्या निदर्शनास हा धक्कादायक प्रकार आला; पुलावर मोठे खड्डे पडले असून त्यातून घातक लोखंडी रॉड बाहेर आले आहेत. पुलाच्या मध्यभागी पडलेल्या या भेगांची आणि विखुरलेल्या बॅरिकेड्