नेवासा शहराचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन शहरासाठी अपेक्षित असणारी सर्व विकास कामे आणि नागरिकांच्या हिताचे चांगले काम करण्याला माझे नेहमीच प्राधान्य असेल. शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी नेवासकरांसाठी मी नेहमीच कटिबद्ध राहणार असल्याचे सांगत विकासकामे करण्याचे डॉ. घुले यांनी आश्वासन दिले.