भंडारा तालुक्यातील शहापूर येथे १६ जानेवारी रोजी ८२ व्या ऐतिहासिक 'भीम मेळाव्याचे' भव्य आयोजन करण्यात आले असून, या निमित्ताने बुद्ध-भीम गीतांचा एक अभूतपूर्व 'वैचारिक मुकाबला' रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. शहापूर येथील बुद्ध विहार प्रांगणात सायंकाळी ८ वाजता रंगणाऱ्या या सांगीतिक सोहळ्यात विदर्भाची लाडकी गायिका निशा धोंगडे आणि मुंबईचे ख्यातनाम गायक छोटा मिलिंद यांच्यात स्वरांचा जुगलबंदी पाहायला मिळेल. भीम मेळावा पंच समिती, बुद्ध विहार ट्रस्ट आणि पंचशील महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमान