कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत जुवाडी येथील एसएलआर जिनिंग अँड प्रेसिंग येथे भारतीय कापूस महामंडळ (C.C.I.) च्या कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ सोमवारी (दि. २२ डिसेंबरला) दुपारी १२.३० वाजता पार पडला. या वेळी परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे उद्घाटन एसएलआर जिनिंगचे संचालक नितीन सारडा यांच्या हस्ते झाले. सीसीआयचे केंद्र प्रमुख चंद्रशेखर हिवसे, सिंदी शेतकी खरेदी विक्रीचे नांदुरकर, बाजार समितीचे अमोल ढोक यांची प्रमुख उपस्थिती होती.