अलिबाग: मनसे महाविकास आघाडीसोबत आली तरी आम्हाला फरक पडणार नाही.:-मंत्री भरत गोगावले..@raigadnews24
Alibag, Raigad | Oct 14, 2025 आगामी काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सध्या महाविकास आघाडी मनसेला सोबत घेत असल्याच्या चर्चा आहेत, संजय राऊत हे मनसेला घेण्यासाठी स्वइच्छुक असल्याच्या चर्चा रंगल्या असताना मंत्री भरत गोगावले यांनी मात्र मनसे जरी महाविकास आघाडी सोबत गेली तरी त्याचा आम्हाला कोणताच फटका बसणार नाहीये, शिवाय रायगड जिल्ह्यात आणि कोकणामध्ये वैभव खेडेकर यांनी मनसेची साथ सोडल्यामुळे आम्हाला तशी कोणतीच अडचण भासणार नाहीये असं सुद्धा वक्तव्य मंत्री भरत गोगावले यांनी केलं आहे.