नागपूर ग्रामीण: नागपूरच्या जिल्हाधिकारी पदाची सूत्रे कुमार आशीर्वाद यांनी स्वीकारली; डॉ. विपीन इटनकर यांच्याकडून पदभार ग्रहण
नागपूर जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी म्हणून कुमार आशीर्वादnयांनी आज आपला पदभार अधिकृतपणे स्वीकारला. मावळते जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात पदभाराची सूत्रे सोपवली आणि त्यांचे स्वागत केलेनवनियुक्त जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे उच्चशिक्षित सनदी अधिकारी आहेत. त्यांनी देशातील नामांकित खडगपूर आयआयटी येथून अभियांत्रिकीची पदवी संपादन केली आहे.