स्थानिक गुन्हे शाखा भंडारा व सिहोरा पोलिसांनी महालगाव-गोंदेखारी रोडवर ४ जानेवारी रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास धाड टाकून अवैध रेतीची वाहतूक करणारा विना क्रमांकाचा सोनालीका ट्रॅक्टर पकडला. या कारवाईत आरोपी चालक रोशन केशवराव परसमोडे (३१, रा. वारपिंडकेपार) याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून ७ लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर व ६ हजार रुपयांची एक ब्रास रेती असा एकूण ७,०६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. परवाना नसताना विनापरवाना रेतीची चोरी केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्ष