मुंबई भाजपा कडून उद्या महिलांची विशेष सिंदूर यात्रा
आज दिनांक 21 मे 2025 वेळ सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास दादरच्या वसंत स्मृती या भाजप कार्यालयामध्ये मुंबई भाजपा महिला मोर्चा ची एक बैठक मुंबई भाजपा उपाध्यक्ष अमरजीत मिश्रा यांच्या नेतृत्वात पार पडली या बैठकीमध्ये उद्या मुंबई भाजपाकडून महिलांची विशेष सिंदूर यात्रा काढली जाणार असून या यात्रेचा सुरुवात दादरच्या चैत्यभूमी येथून होणार असल्याची माहिती मुंबई भाजपा उपाध्यक्ष अमरजीत मिश्रा यांनी दिली.