नागपूर येथील भारतीय जनता पक्ष (भाजप) च्या कार्यालयात विदर्भ संघटन मंत्री व वरिष्ठ नेते श्री. उपेंद्र कोटेकर यांची चंद्रपूर भाजपा नेते, cdcc बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी आज दि 13 डिसेंबर 1 वाजता सदिच्छा भेट दिली. या कार्यक्रमात वरोरा विधानसभा संघटक किशोर बावणे हे सुद्धा विशेष रूपाने उपस्थित होते.या भेटीदरम्यान वरोरा विधानसभा क्षेत्रातील पक्ष संघटना आणि आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या तयारीसंदर्भात माहिती देण्यात आली.