कामठी: रनाळा परिसरात चोरांच्या आतंक, 3 चोरटे सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद, फुटेज वायरल
Kamptee, Nagpur | Sep 21, 2025 रनाळा परिसरात काही दिवसांपासून चोरांच्या आतंक सुरू असून येथील दुकानात चोरी होत असल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरलेले आहे. हे चोरटे दुचाकी ने येतात आणि दुकानाचे शटर तोडून मुद्देमाल चोरून नेतात.दरम्यान टिंबर च्या दुकानात अज्ञात आरोपींनी चोरी केली हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असून आरोपीने चोरी करण्याआधी सीसीटीव्ही कॅमेरा तोडल्याचे देखील व्हिडिओत कैद झाले आहे.