मुदखेड: चिकाळा-माळकोटा रोडवर निसर्ग हाॅटेल येथे विनापरवाना देशी,विदेशी दारू व बियर चोरटी विक्री करणाऱ्यावर मुदखेड पोलिसात गुन्हा
Mudkhed, Nanded | Oct 13, 2025 नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील चिकाळा ते माळकोटा रोडवर निसर्ग हॉटेल येथे दि १२ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी चारच्या सुमारास यातील आरोपी संतोष दिगंबर सिंह राठोड हा विनापरवाना बेकायदेशीर रित्या देशी / विदेशी दारू व बियर किमती 7660 रुपयाचा मुद्देमाल चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात बाळगलेला पोलिसांना मिळून आला. याप्रकरणी फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज सायंकाळी मुदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असुन पुढील तपास सुरू आहे.