गोपनिय माहितीचे आधारे आज दि २० नोव्हेंबर ला १२ वाजता स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पथकाने पोलीस स्टेशन रामनगर हद्दीत सापळा रचुन अवैधरित्या गौण खनिज (रेती) ची चोरटी वाहतुक करीत असलेला हायवा ट्रॅक पकडुन रेती वाहतुक करणाऱ्या आरोपी राम पेशने वय ५५ वर्ष रा. विसापुर ता. बल्लारपूर यास ताब्यात घेवुन त्याचेविरुध्द पोलीस स्टेशन रामनगर येथे कलम ३०३(२), ३(५) भारतीय न्याय संहिता, सहकलम ४८ (७), ४८(८) म.ज.म.स. सहकलम १७७ मो. वा. का. अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला