जालना: माजी नगरसेवक विजय पवार यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल; सोमेश्वर महादेव मंदिर व कसबा परिसरात साफसफाई*
Jalna, Jalna | Jul 6, 2026 प्रभाग क्रमांक १० मधील सोमेश्वर महादेव मंदिर आणि कसबा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून घाणीचे साम्राज्य पसरले असल्याची नागरिकांची तक्रार होती. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक विजय पवार यांनी जालना महानगरपालिकेकडे निवेदन देत तातडीने स्वच्छता न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर महानगरपालिकेने संबंधित परिसरात स्वच्छता मोहीम राबवत साफसफाई केली. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असून स्वच्छतेच्या कामाची सुरुवात झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, याच प