बीड तालुक्यातील पालवन येथे मराठी अभिनेता सयाजी शिंदे यांनी निर्माण केलेल्या सह्याद्री देवराई या वनखात्याच्या जंगलात बुधवार दि. २४ डिसेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास आग लागली. या आगीत सुमारे अर्धा एकर जंगल जळून खाक झाले आहे. आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ वनखात्याला माहिती दिली. वनखात्याचे कर्मचारी व ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, वनखात्याकडून पुढील तपास सुरू आहे.