रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने वर्धा वाहतूक पोलिसांनी मोठ्या आवाजाचे अवैध बनावट सायलेंसर वापरणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन कायदा नुसार जप्त करण्यात आलेले 80 डेसिबलपेक्षा जास्त आवाज करणारे 150 सायलेंसर न्यायालयाच्या आदेशानुसार पंचासमक्ष रोलरखाली दाबून नष्ट करण्यात आले. ही कारवाई दिनांक 8 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास बजाज चौकात वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील, उपनिरीक्षक अमोल लगड, एएसआय म