30 जानेवारीला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे पाचपावली हद्दीत राहणारा कुख्यात आरोपी आशिष दिवटे याच्याविरुद्ध अनेक गंभीर प्रकारची गुन्हे दाखल असून आरोपीला हद्दपार करण्यासाठी पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता यावर कार्यवाही करत आरोपीला एका वर्षासाठी शहरातून हद्दपार करून त्याला त्याच्या नातेवाईकाकडे पांढुर्ना येथे सोडण्यात येथे सोडण्यात आले आहे