कल्याण: डोंबिवली येथील निळजे परिसरातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या चिमुकलीवर शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार
Kalyan, Thane | Sep 27, 2025 डोंबिवली येथील निळजे परिसरातून एक धक्कादायक घटना आज दि. 27 सप्टेंबर रोजी दुपारी 2च्या सुमारास उघडकीस आली आहे. निळजे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकाने शाळेत शिकणाऱ्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. सात वर्षाच्या या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाला असून सदर शिक्षकाला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. मानपाडा पोलिसांकडून सध्या आरोपी शिक्षकाची चौकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदर शिक्षकावर 2019 मध्ये देखील मुलींना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत असल्याचा आरोप करण्यात आला होता.