अहमदपूर: अहमदपूरचे शेतकरी भवन शेतकऱ्यांच्या विश्वासाचे प्रतिक - सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे कृऊबा येथे प्रतिपादन
Ahmadpur, Latur | Oct 22, 2025 अहमदपूरचे शेतकरी भवन शेतकऱ्यांच्या विश्वासाचे प्रतिक - सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील अहमदपूर - अहमदपूरचे शेतकरी भवन शेतकऱ्यांच्या विश्वासाचे प्रतिक असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांनी अहमदपूर येथे केले. ते अहमदपूर येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन, सिमेंट रस्ते, तसेच किनगाव येथील कै. मधुकर मुंडे उपबाजार समितीच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.