नागपूर शहर: आशिया कप स्पर्धेत भारताचा विजय, लक्ष्मी भवन चौक येथील ते पोस्टर ठरत आहे चर्चेचा विषय
टीम इंडिया ने आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानवर सात विकेट्स ने विजय मिळविला. पहलगाम हल्ल्यानंतर या सामन्याचा आयोजन करण्यात आल्याने देशवासीयांच्या तीव्र विरोध होता मात्र त्यानंतरही हा सामना झाला आणि भारताने विजय मिळविला. यादरम्यान क्रिकेट संपल्यानंतर नागपुरातील लक्ष्मी भवन चौक येथे नागपूरकरांनी जल्लोष केला. या जल्लोषातील एक पोस्टर मात्र चर्चेचा विषय ठरलेला आहे. ज्यावर क्रिकेट दे गया मजबूरी का पैगाम हम कभी नही भूलेंगे पहलगाम असे लिहिले होते.