जालना: आंतरराष्ट्रीय समपार जागरूकता दिनानिमित्त जालन्यासह सर्व विभागात व्यापक जनजागृती अभियान; 23 समपार फाटकांवर जनजागृती
Jalna, Jalna | Jun 9, 2026 रेल्वे अधिकार्यांनी रस्ता वापरकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून समपार फाटकांवरील सुरक्षितता नियमांचे उल्लंघन केल्यास होणार्या संभाव्य अपघातांबाबत माहिती दिली. मंगळवार दि. 9 जून 2026 रोजी सायंकाळी 5 वजाता मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे रुळ ओलांडण्यापूर्वी थांबणे, दोन्ही बाजूंनी पाहणे आणि मार्ग सुरक्षित असल्याची खात्री करूनच पुढे जाणे आवश्यक असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला. सुरक्षिततेचा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहितीपत्रकांचे वितरण करण्यात आले.