नांदेड शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या शिवाजीनगर भागात महानगरपालिकेतर्फे अनधिकृत जाहिरात होर्डिंग्सवर धडक कारवाई करून द टेबल फॅमिली गार्डन अँड रेस्टॉरंट चे हॉटेल चालक व मालक यांच्यासह बॅनर तयार करणारे व लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने मनपा हद्दीमध्ये जाहिरात फलक लावण्यासाठी एकूण 118 ठिकाणे निश्चित केले असून सदरील ठिकाणी जाहिरात फलकांच्या फ्रेम लावण्यात आलेल्या असून त्या फ्रेमची साईज सुद्धा निश्चित करण्यात आलेली आहे.