भोकरदन: शहरातील अनवा फाटा सह ग्रामीण भागात पावसाचे आगमन, बळीराजा सुकावला
आज दिनांक 22 जून 2026 वार सोमवार रोजी सायंकाळी 5 : 30वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील अनवा फाटा सह शहरात व ग्रामीण भागात तुरळक ठिकाणी पाऊस बरसला आहे, यामुळे मागील काही दिवसापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा सुखावला असल्याचे चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे. कारण हजारो हेक्टर वरील खरीप पेरण्या रखडले आहे शेती मशागतीचे कामे पूर्ण होऊन बळीराजाला पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे, आणि आता पावसाचे आगमन झाल्याने खरीप पेरण्या होण्याचे संकेत मिळाली आहे.