नांदेड: मार्कंड येथील गोदावरी नदी पात्रात तराफे नष्ट करून अज्ञात दोन रेती तस्कराविरुद्ध ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
Nanded, Nanded | Oct 30, 2025 दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान मार्कड शिवारातील गोदावरी नदी पात्रात येथे, यातील अज्ञात दोन आरोपीतानी संगनमत करून तीन तराफे किमंत 1,50,000/- रू च्या सहयाने नदीपात्रातुन पाच बास रेती किंमत 25,000/- रू चा मुद्देमाल उपसा करून साठवणूक करून ठेवलेल मिळून आला, तीन तराफे जागेवर जाळुन नष्ट करण्यात आले. फिर्यादी पोकों संतोष मारोतराव पवार, ने.पोस्टे नांदेड ग्रामीण यांनी दिलेल्या फिर्यादवरुन ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये 2 अज्ञात आरोपी रेती तस्कराविरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल