सेनगाव: रब्बी हंगामातील पिकांची वन्य प्राण्यांकडून नासाडी तात्काळ बंदोबस्त करा, शरद पवार गटाचे परमेश्वर इंगोले
सेनगांव तालुक्यात सद्यस्थितीत रब्बी हंगामाची पेरणी सुरू असून मात्र पेरणी केलेल्या पिकांमध्ये वन्यप्राणी हैदोस घालून प्रचंड नुकसान करत असल्यामुळे तात्काळ या वन्य प्राण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस परमेश्वर इंगोले यांनी आज शासनाकडे केली आहे. अगोदरच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत असताना त्यातच रब्बी हंगामातील पिकांची रोही,डुक्कर, हरिण हे वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात नासाडी करत आहेत.