वरोरा: वरोरा येथील शिंदे शिवसेना कार्यालयात युवासेना उबाठा गटाचे शहरप्रमुख प्रज्वल जानवे यांचा शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे) पक्षात नव्या कार्यकर्त्यांचा ओघ वाढला असून या पार्श्वभूमीवर युवासेना उबाठा गटाचे शहरप्रमुख प्रज्वल जानवे यांनी आज शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केला.हा पक्षप्रवेश सोहळा शिवसेना लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे जनसंपर्क कार्यालय वरोरा येथे आज दि 2 नोव्हेंबर ला 12 वाजता पार पडला.