दौंडच्या वरवंडमध्ये भीषण आग! शॉर्टसर्किटमुळे 'ओम साई मोटर्स' जळून खाक, लाखोंचे नुकसान
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वरवंड परिसरात मंगळवारी रात्री ओम साई मोटर्स या वाहन दुरुस्तीच्या दुकानाला भीषण आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
रात्री साडेआठच्या सुमारास दुकानातून धूर आणि आगीच्या ज्वाळा बाहेर पडताच परिसरात एकच खळबळ उडाली. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संबंधित यंत्रणाही घटनास्थळी दाखल झाल्या.
या आगीत दुकानातील वाहनांचे सुटे भाग, विविध उपकरणे आणि इतर साहित्य जळून खाक झाले असून, दुकानमालकाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची माहिती आहे. सुदैवाने आग वेळेत आटोक्यात आल्याने मोठी जीवितहानी टळली.
#Daund #Varvand #FireIncident #ShortCircuit #PuneNews #BreakingNews
Pune City, Pune | Jul 30, 2026