'श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान'चे संस्थापक पूज्य संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी आयोजित केली जाणारी 'धारतीर्थ गडकोट मोहीम' यंदाही मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे. नागपूर विभागातील कामठी तालुक्यातून शिवभक्तांची एक तुकडी या मोहिमेसाठी नुकतीच रवाना झाली.यंदाची ही मोहीम श्री लोहगड ते श्री भीमगड अशी असून, यामध्ये मोठ्या संख्येने तरुण आणि लहान मुलांनी सहभाग नोंदवला आहे.