औसा: सायकल संवाद यात्रेतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश फटाके मुक्त दिवाळी, प्लास्टिकमुक्त लातूरचा संकल्प;५३० कि मी प्रवास
Ausa, Latur | Nov 2, 2025 औसा -पर्यावरण संवर्धन, प्लास्टिक मुक्ती आणि फटाके मुक्त दिवाळीचे जनजागरण या संदेशासाठी लातूर जिल्ह्यातील ९ तालुक्यांमधून ५३० कि.मी.चा सायकल प्रवास “सायकल संवाद यात्रा” आयोजित करण्यात आला. माणूस प्रतिष्ठान लातूरच्या “माझं घर” प्रकल्पातील मुलांनी या यात्रेत सहभाग घेऊन पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश दिला.गेल्या सात वर्षांपासून फटाका मुक्त दिवाळी साजरी करणाऱ्या “माझं घर” प्रकल्पातील या चिमुकल्यांनी यंदा एक नवा आदर्श घातला आहे.