मालेगाव: मालेगाव शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईप लाईन फुटली.. लाखो लिटर पाणी गेले वाया..
मालेगाव शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईप लाईन फुटली.. लाखो लिटर पाणी गेले वाया.. पाणी पुरवठा झाला विस्कळीत... ANC :-मालेगाव शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईप लाईन आज दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे दोन वाजेच्या दरम्यान फुटून त्यातून लाखो लिटर पाणी वाया गेले.उड्डाणं पुला खाली असलेली ही पाईप लाईन फुटल्यामुळे रस्त्याना अक्षरशः नदीचे स्वरूप आले होते.पाईप लाईन दुरुस्तीसाठी बराच वेळ लागणार आहे.